वर्धा – राज्यसभेचे खासदार शरद पवार उद्या वर्ध्यात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या अमृत महोत्सवाच्या समारोपीय सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा उद्या दुपारी २ वाजता वर्ध्यातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात पार पडणार आहेत.या सोहळ्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि काग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार अनिल देशमुख, शेकापचे नेते जयंत पाटील आणि आदी मान्यवर हजेरी लावणार आहे. सुरेश देशमुख यांनी सहकार व शिक्षण क्षेत्रात केलेले कार्य आणि जिल्ह्याच्या सांस्कृतिक, साहित्य, सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा आढावा घेणाऱ्या लोकनेता या गौरव अंकाचे प्रकाशन शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |