शनिवारी गगनगिरी आश्रमात धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

रायगड – प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही स्वामी श्री गगनगिरी महाराज यांच्या खोपोलीतील पाताळगंगा तीर्थक्षेत्री असलेल्या चैतन्यदायी समाधीस्थानी गगनगिरी आश्रमांत महाराजांचा १७ वा पुण्यतिथी उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजनासह पार पडणार आहे. येत्या शनिवार २५ जानेवारी आणि रविवार २६ जानेवारी रोजी असा दोन दिवस पुण्यतिथी उत्सव होणार आहे.

यानिमित्त समाधीस्थानी विविध धार्मिक,सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याची जोरदार तयारी सुरू असून संपूर्ण कार्यक्रम व्यवस्थित पार पडण्यासाठी सेवेकरी सतत कार्यरत आहेत.उत्सवाच्या मुख्य दिवशी म्हणजेच २६ जानेवारी रोजी पहाटे महाराजांच्या मूर्तीस मंगल स्नान तसेच पादुकांवर अभिषेक पूजन करण्यात येईल.त्यानंतर काकड आरती व इतर धार्मिक विधी संपन्न होतील आणि भाविकांना दर्शनास सोडण्यात येईल.तसेच दिवसभरात आश्रमस्थानी भजन,नामस्मरण होमहवन भंडारा व पालखी सोहळा आणि महाप्रसाद वाटप होणार आहे. जास्तीत जास्त भाविकांनी पुण्यतिथी सोहळ्यात सहभाग घेऊन श्री स्वामी गगनगिरी महाराजांचे दर्शन व आशीर्वादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आश्रमसंस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top