व्याज दरकपातीच्या घोषणेनंतर शेअर बाजारात मोठे चढ-उतार

मुंबई – रिझर्व्ह बँकेने आज व्याजदरात पाव टक्का कपात केल्याची घोषणा केल्यानंतर शेअर बाजारात मोठे चढ-उतार झाले.दिवसाअखेरीस दोन्ही बाजार निर्देशांकांमध्ये घसरण झाली.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ४३ अंकांच्या घसरणीसह २२,५५९ अंकांवर तर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स १९७ अंकांनी घसरून ७७,८६० अंकांवर बंद झाला.बँक निफ्टी २२३ अंकांनी घसरून ५०,१५८ अंकांवर बंद झाला.दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकन डॉलर मजबूत झाल्यामुळे परदेशी गुंतवणूकदार भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत त्यामुळे भारतीय शेअर बाजारात सध्या घसरण होत आहे. डॉलर निर्देशांक सध्या १०७ अंकांच्या वर व्यवहार करत आहे.जोपर्यंत डॉलर निर्देशांक १०० अंकांच्या जवळ येत नाही तोपर्यंत परदेशी गुंतवणूदार भारतीय बाजारात पैसे गुंतवणार नाहीत,असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top