विशाळगड घाटात बिबट्या! पर्यटकांत भीतीचे वातावरण

कोल्हापूर-जिल्ह्यातील विशाळगड-आंबा दरम्यानच्या विशाळगड घाटात प्रवास करणार्‍या प्रवाशांना भरदिवसा बिबट्याचे दर्शन घडले. मात्र या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे.
हा घाट परिसर असल्याने इथे जंगली प्राण्यांचा नेहमी वावर असतो. कोसळणारा पाऊस आणि हिरव्यागार डोंगर दऱ्यातून फेसाळत वाहणारे धबधबे पाहण्यासाठी पर्यटकही इथे येतात. पर्यटनाला आलेल्या काही पर्यटकांना मानोली हद्दीत रस्त्यांवर एका वळणावर बिबट्या दिसला. त्यांनी बिबट्याचा व्हिडीओ तयार केला.हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.यामुळे नागरिक व पर्यटकांत भीतीचे वातावरण आहे. या पार्श्‍वभूमीवर वनविभागाकडून घाटात नागरिकांमध्ये जनजागृती तसेच पॅट्रोलिंग केले जात आहे.घाटामध्ये बिबट्या आढळल्याने पर्यटकांनी व नागरिकांनी सतर्क राहावे व काळजी घ्यावी असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top