विद्यार्थ्यांना आता एसटीच्या एसी ई-बसमधून प्रवास करता येणार

मुंबई – येत्या २०२५ शैक्षणित वर्षापासून विद्यार्थ्यांना एसटीच्या एसी इ-बसमधून प्रवास करता येणार आहे. विद्यार्थ्यांना एसी ई-बसमधून प्रवास करण्याच्या प्रस्तावाला संचालक मंडळाने मंजुरी दिली असून हा प्रस्ताव आता राज्य सरकारच्या परवानगीसाठी पाठविण्यात आला आहे.

सध्या राज्यातील विद्यार्थ्यांना एसटीच्या साध्या बसने प्रवास करण्याची परवानगी आहे. महामंडळ इंधनावरील खर्च कमी करण्यासह पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी ५ हजार १५० एसी ई-बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. त्यापैकी १३८ मिडी बस सध्या ताफ्यात आल्या असून त्या राज्यातील ७ विभागातील विविध मार्गांवर धावत आहेत. या महिन्याच्या शेवटी आणखी १०० बस महामंडळाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ९ मीटर लांबीच्या ३२ आसनी २ हजार ३५० मिडी बस येत्या दोन वर्षांत महामंडळाकडे येणार आहेत. या मिडी बस शक्यतो ग्रामीण भागात चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे या एसी-ई बसमधून विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा देणारा प्रस्ताव महामंडळाने तयार केला होता. या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी आवश्यक आहे.

एसटी महामंडळ वाहतूक महाव्यवस्थापक शिवाजी जगताप म्हणाले राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे ९ ते १० लाख विद्यार्थी, विद्यार्थिनी दररोज शाळा-महाविद्यालयांमध्ये ये- जा करण्यासाठी एसटीने प्रवास करतात. विद्यार्थ्यांना राज्य सरकारतर्फे भाड्यात ६६.६६ टक्के, तर विद्यार्थीनींना अहिल्याबाई होळकर योजनेंतर्गत पूर्ण १०० टक्के प्रवास सवलत दिली जाते. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना एकाच पासवर साध्या आणि एसी इ-बस मधून प्रवासी करता येणार आहे. मंजुरीनंतर ही सुविधा प्रत्यक्षात सुरू होईल. नवीन शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना ही सुविधा मिळेल

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top