मुंबई- मध्य रेल्वेने आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी ६४ आषाढी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या आषाढी विशेष गाड्या नागपूर ते मिरज, अमरावती ते पंढरपूर, खामगाव ते पंढरपूर,लातूर ते पंढरपूर,भुसावळ ते पंढरपूर दरम्यान धावणार आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ट्रेन क्रमांक ०१२०५ नागपूर – मिरज आषाढी विशेष गाडी १४ जुलै रोजी नागपूर येथून सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि मिरज येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१२०६ मिरज – नागपूर आषाढी विशेष गाडी १८ जुलै रोजी मिरज येथून दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१२०७ नागपूर – मिरज विशेष गाडी १५ जुलै रोजी नागपूर येथून सकाळी ८.५० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.५५ वाजता मिरज येथे पोहोचेल. ट्रेन क्रमांक ०१२०८ विशेष गाडी १९ जुलै रोजी मिरज येथून दुपारी १२.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२.२५ वाजता पोहोचेल. नवी अमरावती – पंढरपूर विशेष ४ फेऱ्या, खामगाव – पंढरपूर विशेष चार फेऱ्या, लातूर – पंढरपूर १० फेऱ्या , भुसावळ – पंढरपूर अनारक्षित विशेष दोन फेऱ्या, मिरज – पंढरपूर अनारक्षित मेमू विशेषच्या २० फेऱ्या आणि मिरज – कुर्डूवाडी अनारक्षित मेमू विशेष २० फेऱ्या अशा एकूण मध्य रेल्वेने ६४ आषाढी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.या सर्व आषाढी विशेष गाड्यांचे आरक्षण उद्या ७ जुलैपासून भारतीय रेल्वेच्या सर्व संगणकीकृत केंद्रावर सुरु होणार आहे.