अमरावती – जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात सध्या एका अनोख्या आंदोलनाची चर्चा सुरू आहे.एका वीज खांबाच्या स्थलांतरासाठी एका नागरिकाने चक्क खांबावरच खाट बांधून उपोषण केले. सोनेरी गावात ही घटना घडली आहे.
हा वीज खांब रहदारीसाठी अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे विलास चर्जन यांनी हा खांब रस्त्याच्या बाजूला करण्यासाठी अनेकदा तक्रारी केल्या आहेत.मात्र त्यांच्या तक्रारींची दखल घेतली नसल्यामुळेच त्यांनी चक्क वीज खांबावर खाट बांधून जीव धोक्यात घालत हे अनोखे उपोषण आंदोलन केले. वीज खांबावर खाट बांधून त्यावर बसत त्यांनी उपोषणाला सुरुवात केली. मात्र या उपोषणामुळे प्रशासनाला जाग येणार का, असा प्रश्न सोनोरीत विचारला जात आहे.