लातूर – लातूरमधील साकोळ येथील व्हिक्टोरिया ॲग्रो फुड आणि प्रोसेसिंग प्रायव्हेट कारखान्यात आज दुपारी आग लागली. आगीची माहिती मिळताच देवणी, शिरूर अनंतपाळ आणि लातूर येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले.
या कारखान्यात धान्यापासून अल्कोहोल तयार करण्यात येते. या आगीत कारखान्यातील ४० लाखांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
लातूरमधील व्हिक्टोरिया कारखान्याला आग
