मुंबई – लाडकी बहिणींना २१०० रुपये देण्यावरून विरोधकांनी आज सभात्याग केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीने लाडकी बहिणींना २१०० रुपये देणार असे आश्वासन दिले होते. महायुतीचे सरकार येऊन चार महिने झाले तरी लाडक्या बहिणींना अद्याप २१०० रुपये देण्यात आले नाहीत. लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणार आहात का? असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत उपस्थित केला. बनवाबनवी करून लाडक्या बहिणीला विसरले का?असा खोचक सवालही विरोधकांकडून सरकारला विचारण्यात आला आहे.
यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहिण योजनेत २ कोटी ३३ लाख ६४ हजार महिला लाभार्थी होत्या. २ कोटी ४७ लाख आता लाभार्थी आहेत. याचा अर्थ लाभार्थी वाढले आहेत.आम्ही २१०० रुपये देणार असे आश्वासन नक्की दिले होते. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे विचारपूर्वक लवकरच निर्णय घेतील. लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही, याची काळजी आमचे सरकार घेईल.
लाडकी बहिणींना २१०० रुपये देण्यावरून विरोधकांचा सभात्याग
