लांजा – रत्नागिरी शहरात पाणी योजनेचे काम सुरु असताना बीएसएनएल मोबाईल कंपनीची केबल तुटली. केबल तुटल्याने गेले दोन दिवस लांजा तालुक्यात बीएसएनएलचे नेटवर्क कोलमडले. नेटवर्क नसल्याच्या तसेच इंटरनेट बंद असल्याच्या अनेक तक्रारी बीएसएनएलकडे करण्यात आल्या. लांजा तालुक्यात अनेक ग्राहक हे बीएसएनएल नेटवर्क वापरतात. ग्राहकांची संख्या मोठी आहे. गेले दोन दिवस बीएसएनएल ग्राहकांना नेट नसल्यामुळे मनस्ताप सहन करावा लागत आहेत. इंटरनेट बंद असल्याने काही शाळांमध्ये ऑनलाईन कामे रखडली असून ग्रामीण भागात ऑनलाईन कामे करणाऱ्यांनाही याचा फटका बसला. केबल जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. लवकरच बीएसएनएल नेटवर्क सुरळीत होईल, अशी माहिती बीएसएनएल अधिकाऱ्यांनी दिली.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |