नवी दिल्ली – अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाची घसरण सातत्याने सुरू आहे.आज रुपया ८७.३५ वर घसरला.रुपयाची ही आतापर्यंतची निचांकी पातळी आहे.रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करण्याची शक्यता हे रुपयाच्या घसरणीमागील मुख्य कारण आहे,असे अर्थतज्ज्ञांनी सांगितले.८७.२८ ही रुपयाची याआधीची निचांकी पातळी होती. ही पातळी तोडून रुपयाने आज ८७.३५ चा नवा निचांक गाठला आहे.आयातदारांकडून होत असलेल्या डॉलरच्या वाढत्या वाढत्या मागणीचाही रुपयावर दबाव राहिला. रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीच्या शक्यतेव्यतिरिक्त परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी चालू वर्षात आतापर्यंत ८ अब्ज डॉलर्सच्या भारतीय शेअर आणि बाँड्सची विक्री केल्यामुळे रुपया कमकुवत झाला आहे.रुपयाची घसरण झाल्याने आयात महागली आहे. म्हणजेच सरकारला परदेशातून मालाची आयात करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळे देशांतर्गत महागाई वाढण्याचा धोका आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |