राष्ट्रपती भवनातील लग्न पहिले नाही

नवी दिल्ली – राष्ट्रपती भवनात आज केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या सहाय्यक कमांडंट पुनम गुप्ता यांचा विवाह संपन्न झाला. त्या पंतप्रधानांच्या कमांडो दलातील अधिकारी आहेत. त्यांनी ७४ व्या प्रजासत्ताक दिन संचालनात सीआरपीएफच्या महिला तुकडीचे नेतृत्व केले होते. आपले लग्न राष्ट्रपती भवनात व्हावे अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली होती.त्यानंतर तिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी विवाहाला परवानगी दिली होती. त्यांच्या विवाहाला केवळ जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते. राष्ट्रपती भवनातील मदर तेरेसा वसाहतीत हा विवाह सोहळा संपन्न झाला. हा राष्ट्रपती भवनात झालेला पहिला विवाह असल्याचे सांगितले जात होते. मात्र, हा राष्ट्रपतीभवनतील हिला विवाह नव्हता, अशी माहिती पीआयबी या सरकारी प्रसिद्धी यंत्रणेने दिली आहे. पीआयबीने म्हटले आहे की, राष्ट्रपती भवनात या आधीही अनेक विवाह सोहळे झालेले आहेत. राष्ट्रपती भवनातील कर्मचाऱ्यांच्या मुलामुलींचे विवाह सोहळेही राष्ट्रपती भवनातील वसाहतीतच झाले आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top