अयोध्या – अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या उद्घाटनाला आज एक वर्ष पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०२४ या मंदिराचे उद्घाटन केले होती. या कार्यक्रमाला पहिल्याच दिवशी ५ लाखांहून अधिक भाविकांची अभूतपूर्व उपस्थिती होती. तर मागील वर्षभरात देश-विदेशातील ३ कोटींहून अधिक भक्तांनी रामलल्लाचे दर्शन घेतले आहे. १ जानेवारी २०२५ रोजी या इंग्रजी नववर्षाच्या पहिल्या दिवशी ५ लाखांहून अधिक भाविक राम मंदिराला भेट देण्यासाठी आले होते. आतापर्यंत राम मंदिराला ५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची देणगी मिळाल्याचे सांगितले जात आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या मते, मंदिराच्या समर्पण निधी बँक खात्यात आतापर्यंत ३,२०० कोटी रुपये जमा झाले आहेत. तर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत सुमारे १८ कोटी रामभक्तांनी राम मंदिराच्या बांधकामासाठी दान दिले आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |