राज्यात तापमान वाढले दुपारी उन्हाचा चटका

पुणे- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात वाढझाली आहे. पहाटे १० अंशांच्या खाली गेलेले तापमान आता १६ ते १८ अंशापर्यंत गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यातील तापमान १ ते ३ अंशांनी वाढले आहे. मध्य महाराष्ट्रातील बहुतेक भागात किमान तापमानाचा पारा ११ ते २० अंशापर्यंत गेल्याची नोंद आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात येत्या ३ – ४ दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अंशांची वाढ होणार आहे. त्यानंतर हळूहळू पुन्हा तापमान कमी होईल. विदर्भात पुढील ४८ तास तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यानंतर २ ते ३ अंशांनी किमान तापमानाचा पारा वाढेल, असा अंदाज प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवला आहे.‎‎

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top