परभणी- राज्याच्या काही भागात दमदार पाऊस कोसळत असला तरी काही भाग अजूनही पावसाविना कोरडा आहे.परंतु आजपासून २६ जुलै पर्यंत राज्यभरात जोरदार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तविला आहे.
पंजाबराव डख यांनी आपल्या ताज्या हवामान अंदाजात म्हटले आहे की, आषाढी एकादशीसह १४ ते १८ जुलै दरम्यान राज्यात जोरदार पाऊस पडणार आहे.या काळात ज्या भागात अद्याप पाऊस पडलेला नाही तिथेही दमदार पावसाच्या सरी कोसळणार आहेत.त्यामुळे राज्यातील नद्या,ओढे,नाले पाण्याने भरून वाहताना दिसतील.आज ९ जुलै ते २६ जुलै दरम्यान पूर्व विदर्भ व पश्चिम मराठवाडा,कोकण किनारपट्टी,उत्तर महाराष्ट्र आणि इतर काही भागात सलग दोन दिवस पाऊस मुक्काम ठोकून बरसत राहणार आहे.