राजधानी एक्सप्रेसची सर्वाधिक कमाई ! तेजसचे अव्वल स्थान

नवी दिल्ली – भारतीय रेल्वे ही जगातील एक सर्वात मोठी रेल्वेसेवा आहे. रेल्वेला सर्वाधिक नफा चार राजधानी एक्सप्रेस रेल्वेगाड्या मिळवून देत असल्याचे या संदर्भातील अहवालावरुन सिद्ध झाले आहे.देशभरात रेल्वे हजारो रेल्वेगाड्या चालवत कोट्यावधी प्रवाशांची वाहतूक करत असते. त्यातून रेल्वेला मोठे उत्पन्न मिळते. मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेल्या वंदे भारत रेल्वेगाड्या बहुतांश वेळा रिकाम्या जात असतात. भारतीय रेल्वेला सर्वाधिक उत्पन्न राजधानी गाड्या देतात. यामध्ये पहिल्या क्रमांकावर हजरत निजामुद्दीन बंगळुरु राजधानी एक्सप्रेस आहे. या रेल्वेने २०२२-२३ या आर्थिक वर्षात या रेल्वेने १७६ कोटी रुपायांची कमाई केली आहे. त्या वर्षात या रेल्वेने तब्बल ५ लाख ९५१० लोकांनी प्रवास केला. नवी दिल्ली ते कोलकाता दरम्यान चालणारी सियालदह राजधानी एक्सप्रेसने १२८ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या काळात ५ लाख ९१६४ लोकांनी प्रवास केला. दिब्रुगड राजधानी एक्सप्रेस तिसऱ्या क्रमांकावर असून या रेल्वेने १२६ कोटी रुपयांची कमाई केली आहे तर यातून ४ लाख ७४६०५ लोकांनी प्रवास केला. मुंबई दिल्ली राजधानी तेजस एक्सप्रेसने भारतीय रेल्वेला २०२२-२३ च्या कालावधीत १२२ कोटी रुपायांची कमाई केली असून ४ लाख ८५७९४ लोकांनी मुंबईहून दिल्लीवारी केल्याचे स्पष्ट झाले आहे. या रेल्वेमधील सेवा, वेग व खानपानसेवेच्या दर्जामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या राजधानी एक्सप्रेस लोकांच्या मनात स्थान मिळवून आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top