वॉशिंग्टन – गेल्या शुक्रवारी अमेरिकेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांच्याशी जोरदार शाब्दिक चकमक झाल्यानंतर आता राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला अमेरिकेकडून दिली जाणारी सर्व प्रकारची लष्करी मदत तडकाफडकी स्थगित केली आहे. यामुळे युक्रेन संकटात सापडला आहे.
लष्करी मदत घेऊन युक्रेनकडे निघालेली जहाजे जिथल्या तिथे थांबवण्याचे आदेश ट्रम्प यांनी दिले आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी सादर केलेला युद्धविरामाचा प्रस्ताव झेलेन्स्की यांनी स्वीकारावा आणि दोन्ही देशात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी झेलेन्स्की यांच्यावर दबाव टाकण्यासाठी ट्रम्प यांनी हा निर्णय घेतला आहे,असे व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्याने सांगितले.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या कार्यकाळात युक्रेनला लष्करी मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता ही मदत ट्रम्प यांनी थांबविली आहे.त्यामुळे शस्त्रास्त्र, दारुगोळा, लष्करी वाहने आणि अन्य युद्धसामुग्रीचा युक्रेनला केला जाणारा पुरवठा थांबवण्यात आला आहे.
युक्रेन देश प्रचंड संकटात ट्रम्पनी लष्करी मदत रोखली
