मोरोक्कोत ३० लाख भटके कुत्रे मारणार

राबत – २०३० मध्ये होणारा फिफा फुटबॉल विश्वचषकाचे आयोजन करणाऱ्या ३ देशांतील एक देश असलेल्या मोरोक्कोने ३० लाख भटक्या कुत्र्यांना ठार मारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयावर आता जगभरातून टीका होत आहे.भटक्या कुत्र्यांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी मोरोक्कोचे अधिकारी आणि कर्मचारी अमानवीय आणि बेकायदेशीर पद्धतींचा वापर करत आहे. कृत्र्यांना विषारी इंजेक्शन देणे,सार्वजनिक ठिकाणी गोळ्या झाडून मारणे आणि गोळ्या झाडूनही वाचलेल्या कुत्र्यांना फावड्याचे घाव घालत मारणे,अशा प्रकारच्या पद्धतीने अवलंबण्यात असल्याचा आरोप प्राणी हक्क संस्थेने केला आहे. प्राणी हक्क संस्थेचे वकील जेन गुडॉल यांनी याला जोरदार विरोध केला आहे.त्यांनी फिफाला पत्र लिहून या प्रकरणात लक्ष घालण्यास सांगितले. फिफाला लिहिलेल्या पत्रात गुडॉल म्हणाले की, मोरोक्को प्रशासनाचा निर्णय ऐकून मी हैराण झालो. आमच्या संस्थेचे याकडे बारीक लक्ष आहे. त्यासोबत मी फूटबॉल प्रेमींनाही आवाहन करू इच्छितो की,या भयानक निर्णयाशी तुम्ही सहमत आहात का?.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top