मुख्यमंत्र्यांचे झ्युरिकमध्ये मराठी समुदायातर्फे स्वागत

दावोस- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दाव्होसमध्ये होणाऱ्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागासाठी काल स्वित्झर्लंडच्या झ्युरिक शहरात दाखल झाले. त्यांच्या आगमनानंतर हिंदू स्वयंसेवक संघ आणि सेवा स्वित्झर्लंड संस्थेच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी, स्थानिक मराठी मंडळींनी पारंपरिक पद्धतीने लेझीम खेळत आणि औक्षण करून फडणवीस यांचे स्वागत केले. तर झ्युरिकमधील लहान मुलांनी मराठी गौरवगीत सादर करत त्याच्या ‘पुन्हा येण्या’चे अनोखे स्वागत केले. या स्वागत समारंभाला भारतीय राजदूत मृदुलकुमार आणि उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोज कुमार सिंह उपस्थित होते. सकाळी ६ वाजता झालेल्या या कार्यक्रमासाठी विविध भागांतील मराठी बांधव उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या उत्स्फूर्त स्वागताबद्दल आनंद व्यक्त करत म्हटले की, या स्वागतामुळे मला घरच्याप्रमाणे वाटले. महाराष्ट्राच्या ऊर्जेची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची भावना इथे अनुभवली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top