मुंबई- पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल ते वलसाड फास्ट पॅसेंजर या जुन्या डबल डेकर रेल्वेचे आयुर्मान संपुष्टात आले आहे. त्यामुळे आता या गाडीच्या रचनेत बदल केला जाणार आहे. या गाडीला आणखी चार जादा डबे जोडले जाणार आहेत.
डबल डेकर गाडीला १८ डबे होते. आता त्याऐवजी २२ डबे असणार आहेत.या गाडीला चार जादा डबे जोडले जाणार आहेत. तसेच या गाडीचा डबल डेकर रेक बदलण्यात आला असून त्याऐवजी आयसीएफ डबा जोडला जाणार आहे.ही गाडी २२ डब्यांची करून त्यामध्ये १५ सिंगल डेकर डबे, तीन फर्स्ट क्लास व दोन मालवाहू डबे बसविले जाणार आहे. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित असणार आहे.