मुंबई विद्यापीठाकडून परीक्षांच्या तारखा घोषित

मुंबई – मुंबई विद्यापीठाच्या यंदाच्या विविध विद्याशाखांच्या उन्हाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. पदवी स्तरावरील बीकॉम सत्र ६ ची परीक्षा १८ मार्च, बीएस्सी सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च, बीए सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च २०२५ पासून सुरु होणार आहे. तर बीएस्सी आयटी सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च, वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेअंतर्गत स्वयंअर्थसहाय्यित विषयांची परीक्षा १८ मार्च, बीएमएम आणि बीएएमएमसी सत्र ६ ची परीक्षा २६ मार्च २०२५ ला घेण्यात येणार आहे.त्याचबरोबर विद्याशाखानिहाय मानव्य विज्ञान शाखेसाठी १४,७२३, वाणिज्य शाखेसाठी ७४,४८३, विज्ञान २७,१३४, तंत्रज्ञान १३,००४, विधी ८,७२५ असे एकूण १ लाख ३८ हजार विद्यार्थी या परीक्षांना बसणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या सात जिल्ह्यात एकूण ४३९ परीक्षा केंद्रांवर या परीक्षा होतील. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागानं विकसित केलेल्या डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून डिजिटल युनिव्ह्रर्सिटी पोर्टलवर ३ महिन्यापूर्वीच विद्यार्थ्यांना त्यांचे आसन क्रमांक, परीक्षा केंद्र आणि परिक्षेची माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top