मुंबई -लंडन विमान बिघाडामुळे माघारी

मुंबई – एअर इंडियाचे मुंबई हून लंडनला जाणारे विमान काही तांत्रिक बिघाडामुळे पुन्हा मुंबईला माघारी आणण्यात आले. मुंबई विमानतळावर हे विमान सुरक्षित पणे उतरले असून यातील सर्व प्रवासी सुखरुप असल्याची माहिती एअर इंडियाने दिली आहे.मुंबईहून लंडनकडे जाणारे एअर इंडियाच्या ए १२९ या विमानाने मुंबई विमानतळावरुन लंडनच्या दिशेने उड्डाण केले. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड असल्याचे वैमानिकाच्या लक्षात आले . त्यानंतर हे विमान पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवण्यात आले. ज्या प्रवाशांना तिकीटाचे पैसे परत हवे होते त्यांना ते देण्यात आले. तर इतर प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली,अशी माहिती एअर इंडियाच्या वतीने देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top