मुंबई-पुणे एक्सप्रेसवर तीन दिवस वाहतूक ब्लॉक

मुंबई – मुंबई ते पुणे मार्गावरील यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वेवर गर्डर बसवण्याचे काम करण्यात येणार आहे. यासाठी बुधवार २२ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. या ब्लॉक दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद करुन दुसऱ्या मार्गाने वळवली जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) डोंगरगाव कुसगाव येथे मुंबई कालव्यावर एक पूल बांधत आहे. त्यासाठी खांब बसवण्याचे काम २२ ते १४ जानेवारी दरम्यान दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत होणार आहे. ब्लॉक काळात पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू राहील. मात्र, मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत होणार आहे. २२ ते २४ जानेवारी दरम्यान मुंबई ते पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्यांना दुपारी तीन तासांच्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू शकतो. वाहतूक ब्लॉक दरम्यान मुंबईवरून पुण्याकडे जाणारी वाहतूक वलवण येथून देहू रोड मार्गे वरसोली टोल प्लाझाकडे वळवली जाईल. मात्र, दुपारी ३ नंतर मुंबई मार्गावर वाहतूक सुरळीत होईल. एमएसआरडीसीने वाहनचालकांना ब्लॉकची वेळ लक्षात घेऊन प्रवासाचे योग्य नियोजन करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top