मुंबई – मागील काही दिवसांपासून चीनमध्ये धुमाकूळ घालत असलेल्या ह्युमन मेटान्युमो व्हायरस (एचएमपीव्ही) जगभर झपाट्याने पसरत आहे. भारतात कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्रात नागपूरमध्ये या नव्या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर आता मुंबईत या आजाराचा पहिला रुग्ण आढळल्याने मुंबईकरांची चिंता वाढली आहे.
मुंबईतील एका सहा महिन्यांच्या बाळाला एचएमपीव्हीची लागण झाल्याचे आढळले आहे.
पवईतील हिरानंदानी रुग्णालयात त्याला दाखल केले .या बाळाला सततचा खोकला आहे . त्याच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत घसरल्याने त्याला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय चाचण्यांमध्ये बाळाला एचएमपीव्हीचा संसर्ग झाल्याचे आढळून आले.या संसर्गजन्य आजारावर विशिष्ट औषध उपलब्ध नसल्याने या बाळावर अतिदक्षता विभागात ब्राँकोडायलेटर्सच्या लक्षणांवर उपचार केले जात आहे,असे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.