प्रयागराज – उत्तर प्रदेशातील माफिया अतिक अहमद याने हुबलाल नावाच्या इसमाला धमकावून घेतलेली ५० कोटींची जमीन अखेर आज सरकारने ताब्यात घेतली. अतिक अहमद व त्याचा भाऊ अश्रफ याची २०२३ मध्ये पोलिसांच्या ताब्यात असताना चार युवकांनी भररस्त्यात हत्या केली होती.अतिकच्या हत्येनंतर त्याची पत्नी फरारी आहे, तर सरकारने अतिकच्या बेनामी संपत्तीचा शोध घेऊन जप्तीची कारवाई सुरु केली आहे.
२०१५ मध्ये अतिक अहमदने प्रयागराज नजीक असलेली हुबलाल यांची जमीन धमकी देऊन बळकावली होती. मात्र त्यावेळी त्याने ती जमीन स्वतःच्या नावे न करता वेळ आल्यावर ही जमीन मी माझ्या नावावर करेन, असे सांगून ती जमीन हुबालाल याच्याच नावावर ठेवली.२०२३ मध्ये ५० कोटींची हि मालमत्ता गॅंगस्टर ऍक्ट १४ [१] अन्वये पोलिसांनी जप्त केली. त्यानंतर ती कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात होती. मात्र तीन महिन्यांपर्यंत या जमिनीच्या मालकीबाबत कुणीही दावा करण्यासाठी पुढे आला नाही. उलट मूळ मालक हुबलाल याने सादर जमीन आपल्याला धमकावून अतिकने ताब्यात घेतल्याचे चौकशीत सांगितले . त्यानंतर या जमिनीच्या कागदपत्रांची फाईल प्रयागराज न्यायालयाकडे पाठवण्यात आली. मंगळवारी न्या. विनोद कुमार चौरसिया यांनी ही जमीन सरकारला हस्तांतरित करण्याचे आदेश दिले.