मुंबई- वाघांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्रातून ४ वाघ राजस्थानला पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बदल्यात महाराष्ट्राला काही पक्षी दिले जाणार आहेत.
देशात सर्वात जास्त वाघ महाराष्ट्रातच आहेत. सध्या वाघांची संख्या ६५० असून राज्यात पिंजर्यात बंद असलेल्या वाघांची संख्या १९ इतकी आहे. महाराष्ट्रातील वाघ राजस्थानला पाठविण्याची प्रक्रिया महाराष्ट्राच्या बाजूने पूर्ण झाली आहे. राजस्थान सरकारकडून नॅशनल कन्झर्व्हेशन टायगर अॅथॉरिटीची प्रक्रिया बाकी आहे. चार वाघांच्या बदल्यात महाराष्ट्राला राजस्थानकडून माळढोक, सारस आणि गिधाड पक्षी देणार आहे. राज्यात या पक्ष्यांच्या जाती लुप्त होत चालल्या आहेत.