महाबळेश्वर- महाबळेश्वर पठारावर अंजनी फुलांचा बहर आला आहे. सर्वसाधारणपणे दर दोन वर्षांनी फेब्रुवारी, मार्च या कालावधीत या फुलांना बहर येतो. महाबळेश्वरच्या रस्त्यांवर, विशेषतः श्री क्षेत्र महाबळेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर अंजनीच्या फुलांना बहर आला असून निळसर जांभळ्या रंगाच्या झुपकेदार फुलांचे मनमोहक दृश्य निदर्शनास पडते. या फुलांचे सौंदर्य आणि त्यातून येणारा मंद सुवासामुळे पर्यटक आकर्षित होत आहेत. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव मेमेसिलोन अंम्बेलेंटम असून ते वनस्पतिशास्त्रातील मेलाखोमासिई कुटुंबातील आहे.
महाबळेश्वर पठारावर अंजनी फुलांचा बहर
