प्रयागराज – प्रयागराजच्या त्रिवेणी संगमावर उद्या मौनी अमावस्येनिमित्त दुसरे अमृत स्नान होणार असून त्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. या निमित्ताने प्रयागराजला लाखो भाविक येणार असून विविध आखाडयांच्या स्नानासाठी विशेष मार्गही तयार करण्यात आले आहेत.या दुसऱ्या अमृतस्नानासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडल्या आहेत. देशाच्या विविध भागातून भाविक प्रयागराजला आले आहेत. अमृतस्नानासाठी उत्तर प्रदेश सरकारने येत्या ३० जानेवारी पर्यंत प्रयागराजचे टोल नाकेही बंद केले आहेत. कोखराज, नवाबगंज, सोरांव, सहसों, इंडिया, लालानगर, रामनगर, धसियारी, उमापूर, मुंगारी व हररो टोल नाक्यांवर शुल्क आकारणी करण्यात येणार नाही. अमृतस्नानासाठी प्रयागराजच्या वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात आला आहे. काही मार्ग आखाड्यांच्या स्नानांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. रेल्वेने येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी विविधरंगी आश्रयस्थानेही तयार करण्यात आली आहेत. महाकुंभ परिसरात कोणत्याही प्रकारच्या वाहनांवर बंदी घालण्यात आली असून पोलिसही घोड्यावर बसून स्थितीवर नियंत्रण ठेवत आहेत. महाकुंभाच्या गर्दीवर लक्ष ठेवण्यासाठी कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित कॅमेरेही बसवण्यात आले असून मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |