मस्क यांच्या ‘न्यूरालिंक’चे अंधांना दृष्टी देणारे उपकरण

वॉशिंग्टन- ‘स्पेसएक्स’, ‘एक्स’ आणि ‘टेस्ला’चे सर्वेसर्वा असलेले एलन मस्क यांच्या ब्रेन-चिप स्टार्टअप कंपनी न्यूरालिंकने अंधांसाठी एक उपकरण तयार केले आहे.कंपनीचा दावा आहे की,ज्यांचे दोन्ही डोळे गेले आहेत,त्यांनाही पाहण्यासाठी हे उपकरण मदत करेल.या उपकरणाला अन्न व औषध प्रशासनाकडून मान्यता मिळाली आहे.न्यूरालिंकने या उपकरणाला ‘ब्लाइंडसाईट’ असे नाव दिले आहे.

या आपल्या नव्या उपकरणाबाबत एलन मस्क म्हणाले की, ज्यांचे दोन्ही डोळे गेले आहेत किंवा ज्यांच्या ऑप्टिक नर्व्हला इजा झाली आहे, त्यांच्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरेल.जन्मापासून अंध असलेल्यांना हे उपकरण दृष्टी देण्यास मदत करेल.हे उपकरण सुरुवातीला कमी-रिझोल्यूशनमध्ये दिसेल.हळूहळू दृष्टी सुधारेल.एवढेच नाही तर उपकरण बसवणार्‍या व्यक्तीला इन्फ्रारेड आणि अतिनील (अल्ट्राव्हायोलेट) लहरीही पाहता येणार आहेत. अमेरिकन सरकारने न्यूरालिंकच्या या ‘ब्लाइंडसाईट डिव्हाईस’ला ‘ब्रेकथ्रू डिव्हाईस’ असे नावदिले आहे.हे नाव अशा उपकरणांना दिले जाते, जी जीवघेणी परिस्थिती टाळण्यास मदत करतात.

दरम्यान, न्यूरालिंक यावर्षी ८ रुग्णांच्या मेंदूमध्ये अशी एक चिप रोपण करण्याचाही विचार करत आहे. हे उपकरण अर्धांगवायू झालेल्या रुग्णांना मदत करेल.एलन मस्क यांनी पोस्टमध्ये जिओर्डी ला फोर्जचा फोटोही शेअर केला आहे. जिओर्डी US ‘स्टार ट्रेक : द नेक्स्ट जनरेशन’ या मालिकेतील एक काल्पनिक पात्र आहे. हे पात्र जन्मापासून अंध आहे,परंतु तो गॅझेटच्या मदतीने पाहू शकते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top