नवी दिल्ली – केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आज मेजर ध्यानचंद खेलरत्न आणि इतर क्रीडा पुरस्कारांची घोषणा केली. पॅरिस ऑलिम्पिकमधील दुहेरी पदक विजेती नेमबाज मनू भाकर, जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता डी गुकेश, हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि पॅरा ॲथलीट प्रवीण कुमार यांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. याशिवाय ३२ खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यात महिला हॉकी संघाची कर्णधार सलीमा टेटे, महिला अॅथलेटिक्स ज्योती याराजी , पॅरिस ऑलिंम्पिक मधील कांस्य पदक महाराष्ट्रातील नेमबाज स्वप्नील कुसळे यांचा समावेश आहे. १७ जानेवारीला राष्ट्रपतींच्या हस्ते खेळाडूना हे पुरस्कार दिले जातील.
२०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके जिंकून इतिहास रचणारी भारताची अव्वल नेमबाज मनू भाकर खेलरत्न पुरस्कार यादीत नाव न जाहीर झाल्याने नाराजी होती. यावरून बराच वादही झाला होता. मात्र, आज मनुला खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला.