धाराशिव – मागील दीड महिन्यांपासून भूम तालुक्यात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.हिवरा गावाजवळच्या जंगलात याच बिबट्याने दोन गायींचा बळी घेतला. तर बिबट्याच्या हल्ल्यात एक बैल जखमी झाला आहे.हिवरा गावातील शिवाजी जगदाळे यांनी त्यांची गुरे गावाजवळच्या डोंगरात सोमवारी सकाळी चरण्यासाठी सोडली होती. त्यावेळी बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला.यात दोन गायींचा जागीच मृत्यू झाला,तर एक बैल गंभीर जखमी झाला. तसेच तालुक्यातील मात्रेवाडी येथील शेतकरी भाऊसाहेब माने यांच्या शेतात त्यांचा मुलगा कोंबड्यांच्या पोल्ट्री फार्मकडे जात असताना त्याला बिबट्या दिसला.हा मुलगा पोल्ट्रीमध्ये लपून बसल्याने बिबट्याने त्याला इजा केली नाही. त्यानंतर वन विभागात अधिकारी गजानन दांडगे त्यांच्या टीम सह त्या ठिकाणी पोचले,तोपर्यंत बिबट्या खंडागळे मळ्याच्या दिशेने निघून गेला.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |