भिमाशंकर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद राहणार

पुणे

पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर अभयारण्य १ जुलै ते ३० सप्टेंबरपर्यंत पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. दोन दिवसांपूर्वी लोणावळ्याच्या भुशी धारण परिसरात झालेल्या दुर्घटनेनंतर भिमाशंकर अभयारण्य प्रशासन सतर्क झाले. त्यानंतर येथील पर्यटन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. भिमाशंकर देवदर्शनानंतर भाविक वन्यजीव पर्यटन आणि धबधब्यांवर जातात.

अभयारण्यातील निसरड्या रस्त्यांचा धोका लक्षात घेऊन पर्यटकांचे अपघात रोखण्यासाठी १ जुलै ते ३० सप्टेंबर पर्यत भिमाशंकर अभारण्यात पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत येथे प्रवेश केल्यास वन्यजीव संरक्षक कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे भिमाशंकर अभयारण्य विभागाने जाहिर केले आहे. दरम्यान, पार्टकांना बंदी घातलेल्या ठिकाणांमध्ये कोंढवळ धबधबा, चोंडीचा धबधबा, खोपीवली क्षेत्र, पदरवाडी न्हाणीचा धबधबा नारीवाली सुभेदार धबधबा, घोंगळ घाट नाला खांडस ते भिमाशंकर मार्ग, पदरवाडी शिडी घाट ते काठेवाडी या ठिकाणांचा समावेश आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top