भारत – बांगलादेशमधील शेतकऱ्यांमध्ये सीमेवर राडा

ढाका – शनिवार पासून बांगलादेश आणि भारत सीमेवर मोठा तणाव आहे. आता स्थिती तणावाची असली तरी नियंत्रणात आहे. दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यात मोठी चकमक उडाली आहे. परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अखेर बीएसएफ अश्रुधरुच्या नळकांड्या फोडत परस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे. बांगलादेशातील सीमावर्ती भागातील शेतकरी पळून गेले आहेत. याआधी बीजीबीने सीमांवर काटेरी कुंपण घालायला वारंवार विरोध केला होता.

बीएसएफने प्रसिद्धी पत्रक जारी करीत शनिवारी सकाळी ११.४५ वाजता ११९ व्या वाहिनीच्या सीमाचौकी सुखदेवपूरच्या भारत आणि बांगलादेशाच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर भारतीय आणि बांगलादेश शेतकऱ्यांमध्ये छोट्याशा कारणावरुन वादंग निर्माण झाला आहे. हा प्रकार तेव्हा झाला तेव्हा काही भारतीय शेतकरी नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय सीमेजवळ असणार्‍या शेतात काम करण्यासाठी पुढे गेले होतेभारतीय शेतकऱ्यांनी बांगलादेशच्या शेतकऱ्यांवर पिक चोरल्याचा आरोप केला आहे.ज्यामुळे दोन्ही देशांच्या शेतकऱ्यांमध्ये वाद झाला.या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. दोन्ही बाजूने मोठा जमाव जमल्यानंतर एकमेकांना शिवीगाळ करणे सुरु झाले.त्यानंतर एकमेकांवर दगड फेक केल्याचा आरोप दोन्ही गटांनी केला आहे. सीमेवर अनेक भागात तारांचे कुंपण नसल्याने भारतीय शेतकरी दूरपर्यंत सीमेपलिकडील आपल्या शेतात जात असतात.त्यातूनच हा तणाव वाढला आणि प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याचे समजते .

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top