बोरवेलमधून चिमुकलीची १८ तासानंतर सुटका

जयपूर – राजस्थानमधील दौसा येथे एका उघड्या बोरवेल मध्ये पडलेल्या चिमुकलीची आज तब्बल १८ तासांच्या प्रयत्नानंतर सुखरुप सुटका करण्यात आली. तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.दौसा येथील बांदीकुई भागात काल दोन वर्षांची निरू ही मुलगी आपल्या अंगणात खेळत होती. यावेळी तिथे खोदण्यात आलेल्या बोरवेलमध्ये ती पडली. ही माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर या बोरवेलला समांतर असा दुसरा एक मार्ग खणण्यात आला. यावेळी प्रोक्लेन व जेसीबीचीही मदत घेण्यात आली. या मुलीला बिस्कीट, पाणी व इतर खाद्यपदार्थ देण्यात आले. कॅमेऱ्याच्या सहाय्याने तिच्या हालचालींकडे लक्ष ठेवण्यात येत होते. या १८ तासात ही मुलगी एकदाही घाबरली नाही किंवा रडली नाही. तिने बचाव दलाला सहकार्य केले. अखेर आज दुपारी तिला या बोरवेलमधून सुखरुपपणे बाहेर काढण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top