बीडमध्ये रेल्वेमार्गाची यशस्वी चाचणी

बीड- बीड जिल्ह्यातील राजकीय स्थितीवरुन राजकारण तापले असतानाच आज भारतीय रेल्वेने बीड स्थानक ते राजूर रेल्वेस्थानकादरम्यान रेल्वेची यशस्वी चाचणी घेतली. पुढच्या वर्षी मार्चपर्यंत बीडपर्यंत रेल्वे सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.बीडवासीयांसाठी महत्त्वाच्या असलेल्या अहिल्यानगर, बीड परळी लोहमार्गाचे काम मागील अनेक वर्षापासून सुरू आहे. या मार्गाच्या कामाला गती मिळाली असून आज बीड जवळील विघनवाडी ते राजुरी पर्यंतच्या लोहमार्गाची रेल्वे चाचणी पार पडली. रेल्वेने २०२५ पर्यंत बीड पर्यंत रेल्वे येण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण होण्याची शक्यता असून येत्या मार्चपर्यंत बीडमध्ये तर पुढच्या वर्षी परळी वैजनाथ पर्यंत रेल्वे पोहोचेल असा विश्वास खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला आहे. अहिल्यानगर ते बीड परळी हा २६१ किलोमीटर लांबीचा रेल्वेमार्ग असून पहिल्या टप्प्यात अहमदनगर ते अमळनेर हा १०८ किमोमीटरच्या टप्प्याचे काम झाले होते. त्यानंतर अमळनेर ते विघनवाडी पर्यंतचे काम झाले. बीडच्या शिरुर तालुक्यातील विघनवाडी ते बीड जवळच्या राजुरी गावापर्यंतचे काम पूर्ण झाल्यानंतर आज ही चाचणी घेण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top