रोहतक – डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा गुरमित राम रहीम याला दिल्ली निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा ३० दिवसांचा पॅरोल मंजूर झाला आहे. आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारा बाबा राम रहीमची हरिणाच्या रोहतक येथील सुनारिया कारागृहातून मुक्तता करण्यात आली. त्यावेळी त्याच्यासोबत पोलिसांच्या गाड्यांचा ताफा होता.आश्रमातील दोन महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपात बाबा राम रहीम याला २०१७ मध्ये न्यायालयाने २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. ही शिक्षा भोगत असताना त्याला याआधी तब्बल ११ वेळा पॅरोल आणि फर्लो मंजूर झाला होता.आता त्याला बाराव्या वेळा पॅरोल मंजूर झाला आहे.राम रहीमला हरियाणा पालिकेची निवडणूक असताना १७ जानेवारी २०२२ रोजी पॅरोल मंजूर झाला होता. त्यानंतर ७ फेब्रुवारी २०२२ पंजाब विधानसभा निवडणुकीच्या आधी पॅरोलवर सोडण्यात आले होते. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी हिमाचल प्रदेशची विधानसभा निवडणूक असताना आणि २० नोव्हेंबर २०२३ रोजी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याला पॅरोलवर सोडण्यात आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी तर राम रहीमला ५० दिवसांचा पॅरोल देण्यात आला होता.आता दिल्लीची विधानसभा निवडणूक ५ फेब्रुवारी रोजी होत असून त्याआधी पुन्हा एकदा राम रहीमची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |