प्रयागराज – प्रयागराज रेल्वेस्थानक २६ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १५ फेब्रुवारीला रात्री नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर रेल्वे प्रशासन सतर्क झाले आहे. रेल्वे प्रशासनाने महाकुंभातील वाढती गर्दी लक्षात घेऊन प्रयागराज संगम स्थानक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . याशिवाय महाकुंभात तैनात असलेल्या अधिकाऱ्यांची ड्युटी २७ फेब्रुवारीपर्यंत वाढवली आहे. महाकुंभच्या परिसरात वाहनांचा प्रवेश बंद करून सर्व प्रकारचे पास रद्द केले आहेत. प्रयागराजमधून जाणाऱ्या १९ गाड्यांचे मार्ग बदलले आहेत. संगमपासून १०-१२ किमी लांब बांधलेल्या पार्किंगमध्ये वाहने थांबवली जात आहेत. त्यामुळे भाविकांना संगमावर पायी चालत जावे लागत आहे.
प्रयागराज रेल्वेस्थानक २६ फेब्रुवारीपर्यंत बंद
