पूजा खेडकरला अटकेपासून २६ सप्टेंबरपर्यंत संरक्षण

नवी दिल्ली – चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे यूपीएससीची परीक्षा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने पूजा खेडकरला किंचित दिलासा दिला. त्यांना २६ सप्टेंबरपर्यंत अटक करू नये आणि याप्रकरणी १० दिवसांत सविस्तर तपास करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ सप्टेंबरला होणार आहे.
पुजा खेडकर यांनी उच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात काही अजब दावे केले आहेत. १२ वेळा यूपीएससी परीक्षा दिली असून त्यापैकी ५ वेळा दिव्यांग गटातून परिक्षा दिली आहे. त्यामुळे बाकीच्या ७ वेळा दिलेल्या गृहीत धरु नये. सर्व परिक्षांसाठी सर्व विभागांनी रितसर प्रमाणपत्र दिले आहे. नाव बदलले नाही तर फक्त मधले नाव बदलले असल्याचे या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top