पुण्यात १४ वर्षीय कुस्तीगीराचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन

सातारा – माण तालुक्यातील मलवडी गावच्या १४ वर्षीय कुस्तीगीराचा कुस्ती सरावानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. जय दीपक कुंभार असे मुलाचे नाव असून तो पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात कुस्तीचा सराव करत होता. या घटनेने त्याच्या कुटुंबाला जबर धक्का बसला आहे. तसेच मलवडी गावासह कुस्ती क्षेत्रावरही शोककळा पसरली आहे.

मलवडी गावातील दीपक कुंभार यांनी जय या आपल्या एकुलत्या एका मुलाला नामवंत मल्ल बनविण्याचे स्वप्न पाहिले होते.त्या ध्येयानेच त्यांनी मुलाला सरावासाठी पुण्यातील जाणता राजा कुस्ती संकुलात दाखल केले होते.७ ऑगस्ट २०१० रोजी जन्मलेल्या जयने लहान वयात कुस्तीत चुणूक दाखवली होती.स्थानिक कुस्ती स्पर्धांत तो नावलौकिक मिळवत होता. शालेय कुस्ती स्पर्धेत जयने १४ वर्षे वयोगटात सलग दोन वर्षे राज्यपातळीवर तिसरा क्रमांक तर, यावर्षी १७ वर्षे वयोगटात ६२ विभागीय पातळीवर तिसरा क्रमांक पटकावला होता. नुकत्याच खंडोबा यात्रेनिमित्त झालेल्या कुस्ती मैदानातही जयने नेत्रदीपक कुस्ती करत वाहवा मिळवली होती. जयला महाराष्ट्र केसरी झाल्याचे वडिलांना पाहायचे होते.तसेच जयने देशासाठी कुस्तीत ऑलिम्पिक पदक मिळवावे,हे ध्येय ठेवून त्याच्या वडिलांनी त्याला पुण्यातील कुस्ती संकुलात दाखल केले होते. मात्र, जयच्या आकस्मिक निधनाने त्यांचे स्वप्न अधुरे राहिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top