पुणे महानगर परिवहनची आता पाच नवीन आगारे

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (पीएमपीएमएल)ने हिंजवडी, चऱ्होली, भोसरी, मोशी आणि रावेत अशा पाच ठिकाणी नवीन आगार सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची भोसरी,रावेत आणि मोशी येथील साडेपाच एकर जागा ‘पीएमपी’ने भाडेतत्त्वावर घेतली आहे.

या नवीन पाच आगारांमुळे पीएमपीच्या आगारांची संख्या आता २० होणार आहे.पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सार्वजनिक वाहतूक सेवा आणखी सक्षम करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने भोसरी, रावेत आणि मोशी येथील साडेपाच एकर जागा पीएमपीला भाडेतत्त्वावर दिली आहे. त्याबाबतचा करार करण्यात आला आहे. नवीन आगारांमुळे पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल, असे पीएमपीचे सहव्यवस्थापकीय संचालक नितीन नार्वेकर यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top