पिंपरीतील अनधिकृत बांधकाम आंदोलनानंतर कारवाईला स्थगिती

पिंपरी- आज पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून कुदळवाडी येथे अनधिकृत बांधकामांच्या अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली जात होते. मात्र भंगार दुकाने, गोदाम, कंपन्या, हॉटेल, वर्कशॉप, बेकरी दुकानदार आणि व्यावसायिकांनी पालिकेच्या या कारवाईला विरोध केला. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अधिकारी कुदळवाडी येथे आले असता नागरिकांनी चिखली – मोशी मार्गावर रास्ता रोको करत आंदोलन केले. यावेळी त्यांनी पालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे या भागात काही काळ वाहतूक कोंडी झाली.

महापालिकेने ५ हजार अनधिकृत व्यावसायिक आस्थापनांना नोटीस पाठवली होती. अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र व्यावसायिकांनी बांधकाम काढले नाही. त्यामुळे अनधिकृत आस्थापनावर महापालिकेने कारवाईची भूमिका घेतली होती. या कारवाईविरोधात व्यावसायिकांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर शुक्रवार १४ फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार आहे. तोपर्यंत या कामाला स्थगिती देण्यात आली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top