पालिका निवडणूकसंबंधी सुनावणी पुन्हा पुढे ढकलली

मुंबई- ओबीसी राजकीय आरक्षण याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेली सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर गेली आहे. या निकालानंतरच स्थानिक स्वराज्य संस्था व पालिका निवडणुका होऊ शकतात. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष आहे. मात्र आज होणार असलेली ही सुनावणी पुढे ढकलली असून ही सुनावणी आता 25 फेबुवारी 2025 रोजी होणार आहे. त्यामुळे तोपर्यंत निवडणूक प्रक्रिया सुरूच होणार नाही. निवडणुका न झाल्याने पालिका व इतरत्र लोकप्रतिनिधीच नाहीत अशी स्थिती आहे.
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2021 पासून रखडल्या आहेत. यामध्ये मुंबई महानगरपालिका, राज्यातील 23 महानगरपालिकांसह 25 जिल्हा परिषदा, 284 पंचायत समित्या, 207 नगरपालिका आणि 13 नगरपंचायतींच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या निवडणुकांमध्ये प्रगती न झाल्यामुळे लोकप्रतिनिधींच्या कार्यकाळाचा मुद्दा देखील चर्चेत आहे. महायुती सरकारने 4 ऑगस्ट 2022 रोजी काही अध्यादेश काढले होते, त्यामुळे निवडणुकांच्या प्रक्रिया रखडल्या आहेत. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक खटले दाखल केले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top