नवी दिल्ली- बंगालच्या उपसागरात हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.त्यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार आहे.यंदा पाऊस ऑक्टोबरपर्यंत मुक्काम ठोकणार आहे.तसे झाल्यास पिकाचे नुकसान होऊन आणखी महागाई वाढण्याचे संकेत दिसत आहेत,असे हवामान विभागाच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.
यंदा मान्सून परतण्यास
सप्टेंबरअखेर किंवा त्यापेक्षाही पुढे सुरुवात होऊ शकते.राज्यात भात,कापूस, सोयाबीन,मका आणि डाळी आदी पिकांचे उत्पादन सप्टेंबरअखेर घेतले जाते. याच कालावधीत जर पाऊस पडला तर शेतीचे मोठे नुकसान होण्याचा अंदाज आहे.पुढील पिकासाठी पावसापेक्षा थंडीची गरज आहे.हे पीक थंडीत पेरले तरच त्याचा चांगला लाभ मिळणार आहे.सप्टेंबरच्या तिसर्या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे.त्यामुळे यंदा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत लांबण्याची शक्यता आहे.