पोर्ट लुईस – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसीय मॉरिशस दौऱ्यावर दाखल झाले. १२ मार्चला ते मॉरिशसच्या ५७ व्या राष्ट्रीय दिनाच्या समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्यासह भारतीय लष्कराची एक तुकडी, नौदलाची एक युद्धनौका आणि हवाई दलाचे आकाश गंगा स्काय डायव्हिंग पथक मॉरिशसच्या राष्ट्रीय उत्सवात सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी दोन्ही देशांतील आर्थिक आणि सुरक्षा संबंधांना दृढ करण्यासाठी अनेक करारांवर स्वाक्षरी करणार आहेत. याशिवाय या भेटीत दोन्ही देशातील प्रतिनिधींमध्ये जागतिक व्यापार आणि अमेरिकन टॅरिफचा परिणाम इत्यादी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. २०१५ नंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा दुसरा मॉरिशस दौरा आहे.
पंतप्रधान मोदी मॉरिशस दौऱ्यावर
