पोर्ट लुईस – पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत मॉरिशसबरोबर आज आठ सामंजस्य करार करण्यात आले. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान नवीनचंद्र रामगुलामही उपस्थित होते.या करारांमध्ये रिझर्व बँक व मॉरीशस केंद्रीय बँकेतील प्रणाली बसवण्याबाबत करार झाला असून मॉरिशसमधील १०० किलोमीटरची पाईपलाईन बदलण्यासाठी भारतीय स्टेट बँक कर्ज देणार आहे, मॉरिशसच्या राजदूतांसाठी एक प्रशिक्षण शिबीर भारत राबवणार आहे, भारतीय नौसेना व मॉरिशस पोलिसांमधील सहकार्य, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये परस्पर सहकार्य, त्याचप्रमाणे भारतीय महासागर हवामान व इतर माहितीची आदानप्रदान करणारे आदी सामंजस्य करार यावेळी करण्यात आले. यावेळी मॉरिशसचे पंतप्रधान म्हणाले की, भारत सुरुवातीपासून मॉरिशसचा चांगला मित्र असून भारताकडून आम्हाला सातत्याने सहकार्य मिळत आहे.
पंतप्रधानांच्या दौऱ्यात मॉरिशसशी आठ सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या
