पंढरपूर – माघी एकादशीनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भक्त पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत.एवढ्या मोठ्या संख्येने भक्त येणार असल्याने विठ्ठल मंदिर व्यवस्थापनाने चोख व्यवस्था केली आहे. संपूर्ण परिसरात दीड हजार पोलीस तैनात करण्यात आले आहेत.२६० सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.भक्तांच्या सोयीसाठी ६ मदत केंद्रे उभारण्यात आली आहेत.भक्तांना देण्यासाठी तब्बल सहा लाख प्रसादाचे लाडू तयार करण्यात आले आहेत.
पंढरपुरात एकादशी निमित्तभक्तांचा महासागर लोटला
