वॉशिंग्टन – नासा या अंतराळ संस्थेने सरकारच्या कार्यक्षमता विभागाच्या (डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी) आदोशामुसार आपल्या कर्मचार्यांची कपात करायला सुरुवात केली आहे. नासा आपले तीन विभाग बंद करणार आहे. आतापर्यंत २३ कर्मचार्यांना काढून टाकण्यात आले आहे, अशीही माहिती मिळत आहे.
नासाच्या कर्मचार्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये कार्यकारी प्रशासक जेनेट पेट्रो यांनी म्हटले आहे की, सर्व सरकारी विभागातील मनुष्यबळात कपात आणि त्यांची पुनरर्चना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही प्रक्रिया विचारपूर्वक राबवली जात असून अमेरिकन लोकांसाठी एक प्रभावी आणि कुशल संस्था असावी, याबरोबर वैधानिक जाबाबदार्यांमध्ये समतोल असावा यासाठी पाऊल उचलण्यात आले आहे.
नासामध्ये १८,००० कर्मचारी काम करतात. त्यांच्यापैकी किती जणांना डच्चू मिळणार, हे ठाऊक नाही. नासाच्या या निर्णयावर टीका होत आहे.