मुंबई- नागपाडा येथील ‘बिस्मिल्लाह स्पेस ‘ या इमारतीच्या पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला होता. याप्रकरणी सर जे.जे.मार्ग पोलिसांनी दोन मजुर ठेकेदारांना अटक केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या दोन मजूर ठेकेदारांची नावे अब्दुल दलिम शेख आणि अनिमेष बिश्वास अशी आहेत. नागपाडा येथील डिमटिम रोडवर बिस्मिल्लाह स्पेस नावाची इमारत आहे. इमारतीच्या पाण्याच्या टाकीच्या साफसफाई कामासाठी पाच कंत्राटी कामगार पाण्याच्या टाकीमध्ये उतरले होते. यावेळी हे सर्व कामगार बेशुद्ध पडले. दुर्दैवाने यातील चारजणांचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी आधी चौकशी करून मग विविध कलमान्वये दोन मजुर ठेकेदारांना काल अटक केली.
नागपाड्यात ४ कामगारांच्या मृत्यूप्रकरणी २ ठेकेदार अटकेत
