नववर्षाच्या स्वागतावेळी कर्तव्यावर पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

पुणे- पिंपरी चिंचवडमधील पोलीस उपनिरीक्षकाचा कर्तव्यावर असतानाच अपघाती मृत्यू झाला. जितेंद्र गिरनार असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. नवीन वर्षाच्या स्वागतावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून ते चाकण एमआयडीसीमध्ये गस्त घालत होते. त्यावेळी एक कंटेनर उजव्या लेन मधून चालला होता. हा कंटेनर अचानक डाव्या लेनमध्ये घुसला आणि पीएसआय गिरनार यांच्या गाडीची कंटेनरला जोराची धडक बसली. यात गिरनार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top