सिंगापूर – सिंगापूर दोर्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सिंगापूरच्या संसदेला भेट दिली. त्यावेळी सिंगापूरच्या पंतप्रधान लॉरेन्स वँग यांनी त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदी यांनी लॉरेन्स वँग यांना सांगितले की, “तुम्ही पंतप्रधानपद स्वीकारल्यानंतर ही माझी पहिली भेट आहे. सिंगापूर हा केवळ मित्र देश नाही तर प्रत्येक विकसनशील देशासाठी प्रेरणा आहे. आम्हाला भारतातही अनेक सिंगापूर निर्माण करायचे आहेत.”पंतप्रधान मोदी यांनी लॉरेन्स वोंग यांच्याशी शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. यावेळी परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल हेही उपस्थित होते. त्यासोबत लॉरेन्स वँग आणि नरेंद्र मोदी यांनी सेमीकंडक्टर, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य सहकार्य आणि कौशल्य विकास या क्षेत्रांत महत्त्वपूर्ण करार केले. करारानुसार दोन्ही देश अर्धसंवाहक, क्लस्टर डेव्हलपमेंट, सेमीकंडक्टर डिझाइनिंग आणि उत्पादावर भर देतील.
+29
°
C
H: +29°
L: +24°
Mumbai
Sunday, 26 March
See 7-Day Forecast
Mon | Tue | Wed | Thu | Fri | Sat |
+28° | +29° | +29° | +28° | +28° | +28° |
+24° | +25° | +25° | +26° | +26° | +25° |